राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानादरम्यान निवडणूक केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा करणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

मतदान केंद्रात ईव्हीएम यंत्राची पूजा करणे भोवले

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात पार पडलेल्या मतदानादरम्यान निवडणूक केंद्रावर जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा करणे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात निवडणूक आयोगाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वडगाव धायरी येथील मतदान केंद्रावर घडली.   

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाचे अधिकारी डॉ. अनुराग राजेशकुमार यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकणकर धायरी परिसरात राहण्यास आहेत. पुणे शहरात बारामतीतील मतदार संघातील १२७ मतदान केंद्राचा समावेश होता. बारामती लोकसभा मतदारसंघात पुणे शहरातील धायरी, नऱ्हे, कात्रज आणि वारजे भागाचा समावेश आहे. चाकणकर धायरीमधील सणस शाळेमधील मतदान केंद्रांवर सकाळी सातच्या सुमारास गेल्या. प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी इथे ईव्हीएम मशीनची पूजा केली. चाकणकर यांनी ईव्हीएमची पूजा केल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्या नंतर भरारी पथकातील अधिकारी डॉ. अनुराग राजेशकुमार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest