Pune : कृषी महाविद्यालयाने विकसीत केलेल्या पशु सल्ला प्रकल्पास आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम पारितोषिक

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या तापमान आद्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला प्रकल्पास आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला.

Pune : कृषी महाविद्यालयाने विकसीत केलेल्या पशु सल्ला प्रकल्पास आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम पारितोषिक

कृषी महाविद्यालयाने विकसीत केलेल्या पशु सल्ला प्रकल्पास आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम पारितोषिक

पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या तापमान आद्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला प्रकल्पास आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला.

पुण्यामध्ये राहुरी कृषी विद्यापीठातील हवामान अद्यावत शेती व पाणी व्यवस्थापन प्रकल्पाने "फ्युचरिस्टिक फार्मिंग 2023" या आंतरराष्ट्रीय परिषदेचे दिनांक 2021 डिसेंबर, 2023 रोजी आयोजन केले होते. या परिषदेमध्ये तापमान आद्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला देणारे ॲप विकसित करणाऱ्या डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कणखरे या शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला.

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या विशेष प्रयत्नातून व मार्गदर्शनातून सदर ॲप तयार करण्यात आलेले आहे.

सध्या जागतिक तापमान वाढ व त्याचा विविध क्षेत्रावरती होणारा परिणाम यावर अनेकवेळा चर्चा होत असते. त्याचप्रमाणे तापमान वाढीचा परिणाम म्हणून उष्माघातामुळे जनावरांवरती खूप विपरीत होताना दिसत आहेत. याचाच विचार करून देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व डॉ. धीरज कंखरे यांनी तपमान आद्रता निर्देशांक आधारित पशु सल्ला ॲप तयार केले आहे. डॉ. महानंद माने व डॉ. सुनिल कदम या शास्त्रज्ञांचा या मध्ये सहभाग आहे.

जनावरांवरती अनेक प्रकारचे ताण-तणाव असतात. त्यातील उष्माघाताचा ताण जनावरांवर खूप विपरीत परिणाम करतो. विशेष करून उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस तपमान वाढ होते, त्यावेळेस जनावरांना उष्माघात होतं व अश्या उष्माघात झालेल्या जनावरांचे दूध उत्पादन व प्रजनन क्षमता कमी होते.

विशेष करून संकरित गाई किंवा विदेशी गाई यामध्ये याचा खूप मोठा परिणाम होऊन दूध उत्पादनामध्ये 30 टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. हा दुष्परिणाम टाळण्यासाठी सदर अँप चा वापर करून शेतकरी योग्य प्रकारे व्यवस्थापन करू शकणार आहेत असे डॉ. सोमनाथ माने यांनी नमूद केले. सदर ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून आपल्याला गोठ्यातील अथवा आपल्या परिसरातील तपमान आद्रता यांच्या आधारे निर्देशांक मिळणार असून त्या निर्देशांकाच्या आधारित सल्ला या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामध्ये जर तपमान आद्रता निर्देशांक जास्त वाढला तर त्यानुसार गोठ्यामध्ये फॅन व फॉगिंग सिस्टीम सुद्धा स्वयंचलित होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून उष्माघातामध्ये किंवा तपमान वाढीमध्ये जनावरांचे गोठ्यातील नियोजन, चारा व आहार नियोजन, खाण्याच्या वेळा, पाणी नियोजन,ई. बाबींविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर ॲप बनवताना विविध मॉडेलचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये ओपन एपीआय चा वापर करून आपण इच्छित स्थळावरील तपमान आर्द्रता याची माहिती घेऊन कृषि -हवामान विभागानुसार निर्देशांक काढता येणार आहे. या निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना कोणत्याही ठिकाणावरून त्यांच्या गोठ्यातील अथवा गावातील उष्माघाताची परिस्थिती कळणार आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या मॉडेलमध्ये गोठ्यामध्ये तपमान व आद्रता यांचे सेंसर बसवून आपल्या मोबाईल वर गोठ्यातील माहितीच्या माध्यमातून हा निर्देशांक कळणार आहे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारचे अलर्ट्स मिळणार आहेत. सदर ॲपचा शुभारंभ मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार असून त्यादरम्यान सदरील ॲप शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. सदर ॲप तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व आय.ओ.टी. तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे.

याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माँ. डॉ. प्रशांतकुमार पाटील, आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. कथारिया, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकटेश मायंदे, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली च्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाच्या समन्वयक डॉ. अनुराधा अग्रवाल, राहुरी विद्यापीठाच्या हवामान अद्यावत शेती व पाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे प्रमुख व संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, सहसंशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर व विविध राज्यातील व देशातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest