Pune fire : पुण्यात अग्नितांडव सुरूच, वाघोलीतील गोडाऊनला लागली भीषण आग

पुण्यात आगीचे सत्र सुरूच आहे. वाघोतील उबाळे नगरमधील कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग आज पहाटे ४ च्या सुमारास लागली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 31 May 2023
  • 10:07 am
पुण्यात अग्नितांडव सुरूच, वाघोलीतील गोडाऊनला लागली भीषण आग

पुण्यात अग्नितांडव सुरूच, वाघोलीतील गोडाऊनला लागली भीषण आग

आगीत गोडाऊनमधील सामान जळून खाक

 

पुण्यात आगीचे सत्र सुरूच आहे. वाघोतील उबाळे नगरमधील कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही आग आज पहाटे ४ च्या सुमारास लागली आहे. आगीची माहिती मिळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्र येथील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ च्या सुमारास कावडे वस्ती येथील साई ट्रेडिंग कंपनीच्या गोडाऊनला आग लागली. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये अमूल कंपनीचे बटर, चीज, मिल्क, आईस्क्रीम, ताक, लस्सी, इतर शीतपेय होती. घटनेची माहिती मिळाताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्र येथील दोन अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणण्यात आली. वेळीच आग आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नाही. मात्र, आगीत गोडाऊनमधील सामान जळून खाक झाले आहे. तसेच गोडाऊनमध्ये असलेले एक महिंद्रा पिकअप वाहन जळून खाक झाले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest