पुण्यातील डीएसके कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू

डी एस कुलकर्णी यांचा पुण्यातील कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ईडीची दोन पथके मुंबईहून पुण्याला रवाना झाली असून यांच्याकडूनही कारवाई केली जात आहे. ईडीचे अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणेचे विविध पोलीस या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत.

पुण्यातील डीएसके कार्यालयावर ईडीची छापेमारी सुरू

डी एस कुलकर्णी यांचा पुण्यातील कार्यालयावर ईडीने (ED) छापेमारी केली आहे. सकाळपासूनच ईडीची दोन पथके मुंबईहून पुण्याला रवाना झाली असून यांच्याकडूनही कारवाई केली जात आहे. ईडीचे अधिकारी व केंद्रीय तपास यंत्रणेचे विविध पोलीस या कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके हे काही दिवस जेलमध्ये देखील होते. विविध पोलीस स्थानकांमध्ये डीएसके यांचा विरोधात गुन्हे दाखल नोंदवले गेलेले आहेत. यानंतर डीएसके यांना जामीन देखील मिळाला होता. यानंतर आज सकाळपासून पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर असणाऱ्या त्यांच्या कार्यालयावर ईडीकडून कारवाई केली जात आहे.

पुण्यातील डीएसके (DSK) यांच्या कार्यालयावर ईडीचे पथके पोहचली असून कार्यालयात कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी कुलकर्णी यांनी कोर्टामध्ये ऑफिसमधील कागदपत्रांचा ताबा  मागितला होता. डीएसके यांचे कार्यालय मागील काही वर्षांपासून ईडीच्या ताब्यात आहे. मागील काही वर्षांपूर्वी ईडीने कार्यालय जप्त केलं होतं. डीएस कुलकर्णी यांच्यावर पुण्यामध्ये फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest