हवेली तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय कामकाजाचे विभाजन
पुणे : मौजे लोणी काळभोर ( Loni Kalbhor) येथे स्वतंत्र अतिरिक्त तहसील कार्यालय (Haveli Tehsil Office) हेणार असून पुणे जिल्ह्यातील हवेली तहसील कार्यालयाच्या (Pune News) कामाचे विभाजन करण्यात आले आहे.
हवेली तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विस्तार मोठा आहे. या तालुक्याचे वाढते शहरीकरण व वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील मौजे लोणी काळभोर येथे स्वतंत्र अतिरिक्त तहसील कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये हवेली तहसील कार्यालयाकडे खडकवासला, कोथरूड, खेड, शिवापूर, कळस या मंडळांचे कामकाज केले जाणार आहे. तर अतिरीक्त तहसील कार्यालय लोणी काळभोर कार्यालयातून वाघोली, उरळी कांचन व थेऊर मंडळांचे कामकाज होणार आहे. याबाबतचा आदेश राज्य शासनाने काढला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.