राष्ट्रीय हरित प्राधिकरण, पश्चिम विभाग खंडपीठाची दशकपूर्ती
राष्ट्रीय हरित प्राधिकरण,पश्चिम विभाग खंडपीठाच्या दशकपूर्ती निमित्त एनजीटी बार असोसिएशन कडून २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी दशकपूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. या खंडपीठाच्या साधू वासवानी चौक(पुणे) येथील कार्यालयात हा कार्यक्रम अनौपचारिकरीत्या पार पडला.
एनजीटी बार असोसिएशनचे अध्यक्ष एड.सौरभ कुलकर्णी यांनी दशकभरातील महत्वपूर्ण निवाड्यांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष एड.असीम सरोदे,खजिनदार एड.मानसी जोशी यांचीही भाषणे झाली. प्राधिकरणाचे नायमूर्ती आणि तज्ज्ञ सदस्यांनीही मनोगत व्यक्त केले. पर्यावरणाप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांचे स्मरण सर्वानी ठेवावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी एड.राहुल गर्ग, एड.रघुनाथ महाबळ, एड.सुप्रिया डांगरे, एड.अनिरुद्ध कुलकर्णी इत्यादी उपस्थित होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.