पुण्यातील वर्दळीचे आणि अरुंद भागांचे फायर ऑडिट करा, पालकमंत्र्यांच्या सुचना

पुण्यात गेल्या २४ तासात जवळ तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 04:01 pm
पुण्यातील वर्दळीचे आणि अरुंद भागांचे फायर ऑडिट करा

चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटलांनी दिल्या महापालिका आणि अग्निशमन विभागाला सुचना

पुणे येथील टिंबर मार्केटमध्ये फर्निचर गोदामात भीषण आग (pune fire) लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या घटनेला ४ दिवस उलटत नाहीत तोच पुण्यात गेल्या २४ तासात जवळ तीन आगीच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट (fire audit) करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.

गेल्या ४ दिवासांपुर्वीच टिंबर मार्केटमधील सात ते आठ गोदामात भीषण आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात आजूबाजूच्या काही घरांनाही आग लागल्याने अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. या घटनेला ४ दिवस उलटत नाहीत तोच रविवारी मध्यरात्री मार्केट यार्डमधील कागद आणि पुठ्ठा साठवणुक असणाऱ्या गोदामाला आग लागली. यात दुर्घटनेत दोन टेम्पो जळून खाक झाले आहे.

तर दुसरीकडे कल्याणीनगर येथील कल्याणीनगर येथील मारीगोल्ड आयटी पार्क येथील इमारतीला आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीत एकूण १९ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातील १४ जण किरकोळ जखमी असून त्यांना जाग्यावर उपचार देण्यात आले आहेत. तर ५ जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल घेऊन शहरातील वर्दळीच्या भागांचे तसेच अशाप्रकारच्या अरुंद भागांचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महापालिका आणि अग्निशमन विभागाला दिले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest