संग्रहित छायाचित्र
पुणे : वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभागांतर्गत (Yerwada Traffic Departments) पार्किंग व्यवस्थेत बदल (parking Changes ) करण्याचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत. (Traffic Changes)
येरवडा वाहतूक विभागात बदामी चौक ते सुदामा भेळ सेंटर आणि हर्मेस हेरीटेज फेज २ व ३ सोसायटी इन गेट ते शास्त्रीनगर चौक येथील रस्त्याच्या दुतर्फा नो पार्किंग झोन, सुदामा भेळ ते ईशान्य मॉल चौकाच्या उत्तर बाजुस नो पार्किंग तर दक्षिण बाजुस पार्किंग, ईशान्य मॉल गेट ते शांतीरक्षक चौक आणि शांतीरक्षक चौक ते कर्णे हॉस्पीटल येथील पी १ व पी २ पार्किंग तर कर्णे हॉस्पीटल कडून हर्मेस हेरीटेज फेज २ व ३ सोसायटी इन गेटकडे जाताना डाव्या बाजुस नो पार्किंग, उजव्या बाजुस ५० मीटर दुचाकीसाठी ५० मीटर चारचाकी वाहनासाठी समांतर पार्किंग करण्यात येत आहे.
वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात ७ नोव्हेंबर पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उपआयुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.