संग्रहित छायाचित्र
पुणे: पीएमपीकडून (PMP) प्रवासी वाहतूक पास देण्यात येतो. हा पास काढताना पास केंद्रावर रोख पैसे द्यावे लागत होते. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट सुविधा (Online payment facility) नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. आता मात्र या त्रासातून सुटका होणार असून पाससाठी क्यू-आर कोडद्वारे (QR code) पेमेंटची सुविधा प्रशासनाने सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. ही सुविधेचा सोमवार पासून सुरू होणार आहे. (PMP Cashless facility)
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्या शुभहस्ते आणि परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार या सुविधेचे उद्घाटन होणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळामध्ये १ ऑक्टोबर २०२३ पासुन सर्व बसेस मध्ये ई – तिकीट मशीन मध्ये तिकीट काढून कॅशलेस पेमेंट सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्याला प्रवासी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ ऑक्टोबर २०२३ ते २० ऑक्टोबर २०२३ याकालावधीत महामंडळाला रक्कम रुपये १९,४९,४००/- इतके उत्पन्न मिळाले असून ७३,७२८ तिकिटांची विक्री करण्यात आली आहे. तर ८९,३६८ प्रवाशांनी कॅशलेस (क्युआर कोड द्वारे) तिकीट काढली आहेत.
महामंडळाच्या सर्व पास केंद्रावरून विविध प्रकारच्या पासेसची विक्री केली जाते. महामंडळास महिन्यातून सरासरी पास विक्रीतून ५ कोटी रुपयाचे उत्पन्न प्राप्त होत असते तर सरासरी ६० हजार पासची विक्री होत असते. परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह यांच्या संकल्पनेतून सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २०२३ पासुन महामंडळाच्या सर्व ४० पास केंद्रावर प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तरी पास काढण्यासाठी सर्व नागरिकांनी कॅशलेस सुविधेचा वापर करून पेमेंट करावे असे आवाहन पीएमपी प्रशासनाने केले आहे. प्रवाशी नागरिकांना पाससाठी क्यू-आर कोडद्वारे पेमेंट करता येणार.
कॅशलेस पेमेंट सुविधेमुळे पासविक्रीच्या ज्या जुन्या सुविधा चालू आहेत त्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पीएमपीने स्पष्ट केले आहे.
प्रवासी पास काढताना काय करावे
- पास केंद्रावरील सेवकास ऑनलाईन क्युआर कोडची मागणी करावी.
- क्युआर कोड स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करावे.
- पास केंद्रावरील सेवकांकडून पास प्राप्त करून घेणे
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.