संग्रहित छायाचित्र
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत मुंबई व पुणे वाहिनीवर ढेकू गाव किमी ३७/०० येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू आहे. त्यामुळे ८ नोव्हेंबर रोजी दुपारी २ ते २.३० या वेळेत पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी २.३० ते ३.०० या वेळेत मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली.
काम पुर्ण झाल्यावर दुपारी २.३० वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी आणि दुपारी ३.०० वाजता मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.