संग्रहित छायाचित्र
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली असून जिल्ह्यातील महाविद्यालयात व्यवसायिक, अव्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईनपद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
या संकेतस्थळावर अर्ज भरण्याची मुदत १६ डिसेंबर २०२४ अशी देण्यात आली होती, तथापि आता ती वाढवून ३१ डिसेंबर २०२४ अशी करण्यात आली आहे. ऑनलाईन संकेतस्थळाचे प्रथम वर्ष असल्याने चालू वर्ष सन २०२४-२५ करीता व्यवसायिक अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्ज पोर्टलवरून डाऊनलोड करावे.
तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ३१ जुलै २०२४ पूर्वी थेट संबंधित वसतिगृहात ऑफलाईन अर्ज सादर केले असतील त्यांनीदेखील ऑनलाईन अर्ज संकेतस्थळावर भरावे. या अर्जांची प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहात किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालयास ऑफलाईनरित्या सादर करावे.
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता एकत्रित नव्याने संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशकरीता अर्ज करुनही अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांची गुणवत्तेअभावी निवड न झालेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज या प्रणालीव्दारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरीता ग्राह्य धरले जाणार आहेत, अशी माहिती लोंढे यांनी दिली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.