“वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं”, जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबई येथे आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. जयंत पाटील यांची होणारी चौकशी ही सूडबुद्धीने केली जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक आंदोलन करत आहेत. पुण्यातील बालगंधर्व येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठा संख्येने उपस्थित झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Mon, 22 May 2023
  • 11:41 am
जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

जयंत पाटलांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी आक्रमक

पुण्यातील बालगंधर्व येथे राष्ट्रवादीकडून आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबई येथे आज ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. जयंत पाटील यांची होणारी चौकशी ही सूडबुद्धीने केली जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यात आक्रमक आंदोलन करत आहेत. पुण्यातील बालगंधर्व येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठा संख्येने उपस्थित झाले आहेत. यावेळी वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं”, अशी घोषणाबाजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने बालगंधर्व येथे निदर्शने केली. यावेळी वातावरण फिरलयं, सरकार घाबरलयं”, “ईडीचा गैरवापर करून विरोधी पक्षाला घाबरवणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करणाऱ्या भाजपचा जाहीर निषेध, अशा प्रकारचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, जयंत पाटील यांचा आयएफसी या कंपनीची संबंध असल्याचे सांगत पिढीकडून आज ही चौकशी केली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील ईडीची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अजित पवार यांच्यावर देखील अशा प्रकारची चौकशी लावण्यात आली होती. भाजपाच्या विरोधात आम्ही वारंवार आवाज उठवतो आणि भाजपला शरण जात नाही. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई आमच्यावर केली जात आहे.

दरम्यान, जयंत पाटील आज चौकशीला सामोरे जातील व त्यांची निर्दोष मुक्तता होईल. यानंतर आम्ही भाजपला त्यांची जागा दाखवू, असा इशारा देखील यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे जयंत पाटलांचे चौकशीत काय होते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest