अन् उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतूकीचे नियम; अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार (Ajit Pawar) आले होते.

Ajit Pawar

अन् उपमुख्यमंत्र्यांनीच तोडले वाहतूकीचे नियम; अजित पवार यांचा ताफा उलट्या दिशेने

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ तसेच शिरूरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे अजित पवार (Ajit Pawar) आले होते. यावेळी काही वेळ ते जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून पुन्हा बाहेर आले व निघताना त्यांचा गाड्यांचा ताफा हा उलट्या दिशेने गेला. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी देखील त्यांना अडवले नाही. 

एकीकडे वाहतूक नियमांचे पालन होत नसल्यामुळे पुणेकरांना दंड आकारण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे राजकिय नेत्यांकडून तसेच सरकारी कर्माऱ्यांकडून सर्रास वाहतूक नियंमांचे उल्लघन करण्यात येते त्यामुळे या सर्वांवर वाहतूक पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest