संग्रहित छायाचित्र
पुण्यातील औंध येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान अर्थात एम्स स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. नागपूर एम्सच्या धर्तीवर हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. (AIIMS in Aundh)
वाशिम, जालना, हिंगोली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलडाणा, वाशिम, नाशिक तसेच ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय रुग्णालय तसेच ४३० खाटांची संलग्न रुग्णालये स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच जळगाव, लातूर, बारामती, गोंदिया, नंदूरबार, मिरज इथे संलग्न १०० विद्यार्थी क्षमतेचे नर्सिंग कॉलेज सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूरच्या धर्तीवर औंध पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान स्थापन करण्याचे देखील नियोजन आहे. (Maharashtra Budget 2024)
राज्यातील सर्व कुटुंबांना महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून यामध्ये वार्षिक १ लाख रुपये प्रतिकुटुंबावरून ५ लाख रुपये वार्षिक अशी करण्यात आली आहे. अंगिकृत रुग्णालयांची संख्या १ हजारावरून १९०० करण्यात आली.
पुण्यासाठी घोषणांचा पाऊस
पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटींचा निधी
जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
लोणावळा इथे जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प ३३३ कोटी ५६ लाख किंमत
संगमवाडी, पुणे इथे लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे लवकरच भूमिपूजन
मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय
तुळापूर आणि वढू येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २७० कोटी रुपये किमतीचा आराखडा, काम सुरू
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.