Accident News: मुंबई-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

पुणे : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Mumbai Banglore Highway) झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे काम करीत होते. धडक बसल्यानंतर

Accident News

संग्रहित छायाचित्र

दोघांचा मृत्यू : चार जण गंभीर जखमी

पुणे : भरधाव मोटारीची धडक बसल्याने मुंबई-बंगळुरू महामार्गावर (Mumbai Banglore Highway) झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला. हे कामगार उड्डाणपूलावरील क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे काम करीत होते. धडक बसल्यानंतर हे दोघेही पुलावरून खाली पडले. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच कारमधील चार जण जखमी झाले. (Accident News)

विजय बहादुर  चव्हाण (वय २८, रा. उत्तर प्रदेश), सनी गौड (वय २३, रा. उत्तर प्रदेश) अशी मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत. तर, लक्ष्मण त्रिंबक देशमुख (वय ६३, रा. कुक्कडगाव, ता. परांडा जिल्हा धाराशिव), अशोक त्रिंबक देशमुख (वय ५६, रा. शाहूनगर, पिंपरी चिंचवड), रोहिणी अशोक देशमुख (वय ५०), सविता सुरेश मंत्री (वय ५०, रा. केळेवाडी, कोथरूड) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी कार चालक बाळू महादेव शिंदे (वय ३४, रा. कुदळवाडी, चिखली, पिंपरी चिंचवड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास बेंगळुरू-मुंबई महामार्गावरून कात्रजकडून चांदणी चौकाकडे अल्टो कार (एमएच १४, डीएक्स ९६८८ घेऊन आरोपी जात होता. महामार्गावर असलेल्या वसुधा इताशा सोसायटी समोरील पुलावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. 

या पुलावर चव्हाण आणि गौड हे क्रॉस बॅरियरला रंग देण्याचे काम करीत होते. या कामगारांना या कारची जोरात धडक बसली. त्या धडकेसरशी दोघेही बोनेटवरून उडाले आणि पूलावरून खाली रस्त्यावर जोरात आढळले. थेट पुलावरून खाली पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वारजे पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest