Pune News : “अभाविपचे आरोप बिनबुडाचे”, विद्यापीठातील मारहाण प्रकरणी लोकायत संघटनेचे स्पष्टीकरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एसएफआय व लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 1 Nov 2023
  • 04:08 pm
Pune News : “अभाविपचे आरोप बिनबुडाचे”, विद्यापीठातील मारहाण प्रकरणी लोकायत संघटनेचे स्पष्टीकरण

“अभाविपचे आरोप बिनबुडाचे”, विद्यापीठातील मारहाण प्रकरणी लोकायत संघटनेचे स्पष्टीकरण

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर एसएफआय व लोकायतच्या गुंडांनी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) केला होता. मात्र, अभाविपचे आरोप बिनबुडाचे असून लोकायत संघटनेचा कोणताही कार्यकर्ता मारहाणीवेळी उपस्थित नव्हता, असे स्पष्टीकरण लोकायत संघटनेकडून देण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University) विविध संघटनांकडून विद्यार्थ्यांची दमदाटी करून (Pune News) बळजबरीने सदस्यता करण्यात येत होती. यादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सदस्यता करण्यास नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यास आली. या प्रकरणी अभाविपने एसएफआय आणि लोकायतच्या दोषी कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, घटनेत आपला सहभाग नसल्याचे स्पष्टीकरण लोकायत संघटनेने दिले आहे.

लोकायत संघटना ही संविधानिक मार्गाने काम करणारी व महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रसार करणारी संघटना आहे. लोकायत संघटना कोणत्याही प्रकारचे सदस्यता नोंदणी अभियान चालवत नाही. त्यामुळे १ नोव्हेंबर २०२३ रोजी पुणे विद्यापीठात चालू असलेल्या सदस्यता नोंदणी कार्यक्रमाशी लोकायत संघटनेचा काहीही संबंध नाही आणि त्या ठिकाणी लोकायत संघटनेचा कोणताही कार्यकर्ता उपस्थित नव्हता. त्यामुळे अभाविपकडून लोकायत संघटनेच्या कार्यकर्त्यांवर केलेला आरोप हा पूर्णतः खोटा आहे, असे स्पष्टीकरण लोकायत संघटनेकडून देण्यात आले आहे.

दरम्यान, या हल्ल्यात एसएफआयचे राज्य अध्यक्ष व केंद्रीय कमिटी सदस्य सोमनाथ निर्मळ, शहर सचिव अभिषेक शिंदे, गणेश जानकर या कार्यकर्त्यांना मार लागला आहे. इतरही कार्यकर्त्यांना सुद्धा मुका मार लागला आहे. गुंड प्रवृत्तीची अभाविप कायम असे हिंसक कृत्य करत आली आहे. त्यांनी त्यांच्या गुंड संस्कृतीची पुनरावृत्ती केली आहे. काहीही कारण नसताना, शांततेत एसएफआयचा सभासद नोंदणी कार्यक्रम सुरु होता. घोळक्याने येऊन परवानगी घेतली का? असे विविध प्रश्न विचारून मारहानिस सुरुवात केली. विद्यापीठ सुरक्षा विभागाने देखील फक्त बघ्याची भूमिका घेतली व नंतर मध्यस्ती केली, अशी माहिती एसएफआयकडून देण्यात आली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest