मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात!
मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ७ ते ८ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हा ट्रॅक्टर मजुरांना घेऊन यवतकडे जाता होता त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर पलटी झाले. यामध्ये ७ ते ८ मजूर जखमी झाले असून अपघातात महिला व लहान मुलांचा समावेश आहे. जखमीपैकी तीन ते चार मजुर गंभीर आहेत. या अपघाताची माहिती मिळताच यवत पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.