खेडशिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला

आज (मंगळवार) पहाटे खेड शिवापुर टोल नाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Fire News

खेडशिवापूर टोलनाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर उलटला

आज (मंगळवार) पहाटे खेड शिवापुर टोल नाक्याजवळ अल्कोहोलने भरलेला टँकर पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. खेड शिवापुर टोल नाक्यापुढे असलेल्या तृप्ती हॉटेलसमोर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचा टँकर क्रमांक MH 48 BM 4132 पलटी झाला. या टँकरमध्ये अल्कोहोल होते. हा टँकर सांगलीहून वसई विरारला जात होता. 

टँकर पलटी झाल्याचे समजताच PMRD नांदेड सिटी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वाहन चालक आणि सोबत असलेल्या व्यक्तींना बाहेर काढत किरकोळ उपचारासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच क्रेनच्या मदतीने टँकर बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.

ही कामगिरी अग्निशामक जवान डीएफओ सुजित पाटील, वाहन चालक राठोड, फायरमन शुभम माळी, पंकज माळी, साळुंखे, मायनाले यांनी पार पाडली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest