पुण्यात चक्क बिबट्याचं निघाला चप्पल चोर, अजब घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
पुणे शहरातील निरगुडसर येथे अजब घटना समोर आली आहे. शिकारीच्या शोधात असलेल्या एका बिबट्याने चक्क घरातील चप्पल चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बिबट्याने सुमारे चप्पलच्या तीन जोड्या चोरल्या आहेत. सोमवारी मध्यरात्री घडलेला हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
निरगुडसर येथे वैभव वळसे यांच्या घरातील सर्वजण रात्री झोपलेले होते. यावेळी घराच्या आवारात बिबट्या शिरला. यावेळी बिबट्या शिकारीच्या शोधत होता. बराचवेळी तो इकडे तिकडे शोधाशोध करत होता. मात्र, त्याला काहीच सापडले नाही. त्यानंतर अखेर त्याने घराच्या दारात असलेल्या चपलांच्या तीन जोड्या तोंडत पकडून पळ काढला.
मंगळवारी सकाळी वैभव वळसे यांना जाग आली. मात्र, घराबाहेर जात असताना दारात चप्पल दिसत नव्हती. त्यानंतर घरातील लोकांच्या चप्पला कुठे गेल्या याचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री चोरट्याने तर चप्पल चोरली नाही ना? हे पाहण्यासाठी त्यांनी घराच्या परिसरात लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार समोर आला आहे. मात्र, चक्क बिबट्याने चप्पल चोरल्यामुळे या घडनेची सर्वत्र एकच चर्चा आहे.