संग्रहित छायाचित्र
पुणे : काल मध्यराञी बाराच्या सुमारास काञज, भारती विद्यापीठ समोर, नॅन्सी लेक होम या इमारतीत आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण (Fire Brigade)कक्षात मिळताच दलाकडून अग्निशमन मुख्यालय अग्निशमनवाहन व एक रेस्क्यु व्हॅन, काञज, गंगाधाम, कोंढवा बुद्रुक येथून एकुण ४ वाहने रवाना करण्यात आले. (Pune News)
घटनास्थळी पोहोचताच सदर ठिकाणी ११ मजली इमारतीत दुसरया मजल्यावर १५६० स्क्वे.फुट सदनिकेत मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे पाहताच जवानांनी चारही बाजूने पाण्याचा मारा सुरू केला व त्याचवेळी घरामधे कोणी अडकले आहे का याची खाञी करीत असताना एक लहान मुलगी (कु. राजलक्ष्मी दिलिप सुकरे - वय वर्ष ९) खिडकीमधील लोखंडी ग्रिलमधे अडकल्याने वाचवण्याकरिता आरडाओरडा करीत होती. त्याचवेळी जवानांनी तातडीने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. दोन बी ए सेट तसेच हायड्रोलिक कटर, कटावणी, रश्शीचा वापर करत खिडकीजवळ शिडी लावून त्याचवेळी काही जवानांनी शेजारील सदनिकेच्या गच्चीवरुन मुलीच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अवघ्या पाच ते दहा मिनिटात जवानांच्या प्रयत्नाला यश येऊन आगीमधे अडकलेल्या मुलीची सुखरुप सुटका करण्यात आली. तसेच सदरील आग वीस मिनिटात नियंञणात आली. घराचे मोठे नुकसान झाले असून आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. जखमी वा जिवातहानी नाही. (A 9-year-old girl trapped in the fire was rescued safely by the fire brigade)
या कामगिरीत दलाचे अधिकारी प्रदिप खेडेकर, वाहन चालक येरफुले, अतुल मोहीते, तांडेल मंगेश मिळवणे व जवान रामदास शिंदे, तेजस मांडवकर, चंद्रकांत गावडे, सुधीर नवले, लक्ष्मण घवाळी, दिगंबर बांदिवडेकर, तेजस खरीवले, अर्जुन यादव, अभिजित थळकर यांनी सहभाग घेतला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.