पुणे विद्यापीठ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला लवकरच नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील ५ नावे राज्यपालांकडे पाठवली आहेत. त्यामुळे कोणाला कुलगुरुपद मिळते याकडे लक्ष लागले आहे.
मागील काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पद रिक्त होते. त्यामुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवड समितीने २७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मागील आठवड्यात घेतल्या होत्या. मात्र, कुलगुरू पदासाठी चर्चेत असलेल्या २ ते ३ नावांवर निवडीआधीच प्राध्यापक संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला होता. आता ५ नावे निश्चित करून राज्यपाल कार्यालयाला पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही आहेत राज्यपालांकडे पाठवण्यात आलेली नावे :
डॉ. पराग काळकर - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता
प्रा. अविनाश कुंभार - विद्यापीठातील रसायनशास्त्र विभाग
डॉ.संजय ढोले - भौतिकशास्त्र विभाग
प्रा. सुरेश गोसावी - पर्यावरण शास्त्र विभाग
डॉ. विजय फुलारी - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभाग