पिंपरी-चिंचवड : दोन पोलीस निरीक्षकांसह २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ११ पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.

Pimpri Chinchwad Police

पिंपरी-चिंचवड : दोन पोलीस निरीक्षकांसह २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ११ पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत. याबाबतचे आदेश गुरुवारी (८ ऑगस्ट) रात्री उशिरा काढण्यात आले.

शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निगडीच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांची बदली झाली आहे. नियंत्रण कक्षातून दहा साहाय्यक निरीक्षक, ११ उपनिरीक्षक यांना विविध ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे.

बदली झालेले साहाय्यक पोलीस निरीक्षक 

असे (कंसात नेमणुकीचे ठिकाण)-

अभिनय थोरात (गुन्हे शाखा), मधुकर पवार (वाहतूक शाखा), युवराज कलगुटगे (सांगवी पोलीस स्टेशन), तानाजी कदम (निगडी पोलीस स्टेशन),ज्योती तांबे (विशेष शाखा)

सुभाष चव्हाण (वाकड पोलीस स्टेशन), नवनाथ मोटे (चिखली पोलीस स्टेशन), आसाराम चव्हाण (वाहतूक शाखा), गणपत धायगुडे (चाकण पोलीस स्टेशन), जोहेब शेख (देहूरोड पोलीस स्टेशन)

बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक 

(कंसात नेमणुकीचे ठिकाण)-

अशोक शिर्के (निगडी पोलीस स्टेशन), बाबासाहेब साळुंखे (वाकड पोलीस स्टेशन), लक्ष्मण आकमवाड (सांगवी पोलीस स्टेशन), पंकज महाजन (भोसरी पोलीस स्टेशन), मयूरेश साळुंखे (गुन्हे शाखा), सारंग ठाकरे (हिंजवडी पोलीस स्टेशन), शुभांगी मगदूम (दिघी पोलीस स्टेशन), अनिस मुल्ला (महाळुंगे पोलीस स्टेशन), ज्ञानेश्वर धनगर (वाहतूक शाखा), अनिता दुगावकर (देहूरोड पोलीस स्टेशन), महेंद्र सपकाळ (वाहतूक शाखा)

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest