Talwade Fire : आगीतील जखमी महिला ससूनमध्ये दाखल, मृतांची मात्र अद्यापही ओळख पटेना

तळवडे एमआयडीसीमधील ज्योतीबानगर येथे वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग लागून आत्तापर्यंत ७ मृतदेह मिळाले आहेत. तर ८ महिला जखमी झाल्या आहेत.

Talwade Fire : आगीतील जखमी महिला ससूनमध्ये दाखल, मृतांची मात्र अद्यापही ओळख पटेना

आगीतील जखमी महिला ससूनमध्ये दाखल, मृतांची मात्र अद्यापही ओळख पटेना

तळवडे एमआयडीसीमधील ज्योतीबानगर येथे वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग लागून आत्तापर्यंत ७ मृतदेह मिळाले आहेत. तर ८ महिला जखमी झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर जखमींना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपेक्षा अमोल तोरणे (वय 18, रा. अजिंक्यतारा हाऊसिंग सोसायटी रुपीनगर), प्रियंका अमोल यादव (रा. रुपीनगर), उषा सिताराम पाडवी (वय ४०), राधाबाई (वय 40), कविता गणेश राठोड (वय 35, रा. रुपीनगर श्रीराम कॉलनी), रेणुका मारुती तातोडे (वय २०, रा. रुपीनगर), कमल गणेश चौरे (रा. रुपीनगर ठाकरे शाळा जवळ) आणि शरद सुतार अशी जखमी झालेल्या कामगार महिलांची नावे आहेत. त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या कंपनीत काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आहेत. तापमान वाढल्याने हा स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच शटर असल्याने या महिला कंपनीत अडकल्या. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असेही सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. मात्र, आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर जखमींना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत बोलताना महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले की, मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून बचाव कार्य सुरू आहे वाढदिवसाच्या केक वर लावण्यात येणाऱ्या फुलझडी मेणबत्ती बनवण्याचा कारखान्यात ही दुर्घटना घडली आहे. काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीत मृत्यू झालेल्या सात जणांची ओळख अजूनही पटलेली नाही. मात्र यात 8 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story