संग्रहित छायाचित्र
वाकड-हिंजवडी नवीन लिंकरोड वरील राॅयल मिराज सोसायटीच्या शेजारील ३० मीटर रुंदीचा रस्ता तयार केला आहे. पुढे हा रस्ता हिंजवडीकडे जात असून महापालिका हद्दीतील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु, रस्त्यावर पथदिवे बसविले गेले नसल्याने तेथील नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर अंधार असल्याने अनेक गैरप्रकारदेखील वाढू लागले असून याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेच्या हद्दीतील वाकड येथील ३० मीटर रस्ता विकसित केला असून विद्युत विभागाकडून गेले सहा महिने झाले पथदिवे लावले नाहीत. हिंजवडीकडे जाणारा हा नवीन लिंकरोड असून रॉयल मिराज सोसायटीच्या बाजूने जाणारा रस्ता तयार झाला आहे. पुढे हा रस्ता हिंजवडकडे जातो.
महापालिकेच्या हद्दीतील सदरील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे, पण हिंजवडीकडील बाजूचे काम बाकी आहे. महापालिका हद्दीपर्यंत या रस्त्यावर पथदिवे लावण्यात यावे तसेच रस्त्याच्या बाजूला ओपन जिमचे साहित्य लावण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यावर सकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले-मुली फिरत असतात. पण, सायंकाळनंतर अनेक गैरप्रकार या रस्त्यावर वाढत चालले आहेत. काही प्रेमी युगूलदेखील रस्त्यावर गप्पा मारत थांबलेले असतात. वाकड आणि हिंजवडीलगत हा रस्ता आहे. या रस्त्यावर पथदिवे नसल्याने काही चुकीच्या घटना घडल्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे का, असा सवालदेखील नागरिक करत आहेत.
वाकड ते हिंजवडीकडे जाणारा ३० मीटर रस्ता लिंकरोड महापालिकेने विकसित केला आहे. पालिका हद्दीपर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर सोसायटीतील नागरिकांची ये-जा सुरू असते. रात्रीच्या वेळी मात्र रस्त्यावर जाताना नागरिकांना भीती वाटते, कारण रस्ता विकसित करूनही पथदिवे बसविले नाहीत. काही लोकांनी रस्त्यालगत अतिक्रमण करत पदपथावर वास्तव्य केले आहे. पथदिवे लावण्यासाठी पाठपुरावा करूनही ते दुर्लक्ष करत आहेत. येथे जे काही गैरप्रकार घडत आहेत यातून काही दुर्घटना घडल्यास त्याला पालिका प्रशासन जबाबदार असेल".
- विशाल वाकडकर, प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष (शरद पवार गट)