Pimpri-Chinchwad : कायद्याचे ज्ञान पीडितांसाठी वापरावे; अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज यांचे प्रतिपादन, नव्या सहायक सरकारी वकिलांचे स्वागत

सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़. सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो!' असे मत अध्यक्ष ॲॅड. गौरव वाळुंज यांनी नुकतेच व्यक्त केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 13 Jan 2025
  • 12:14 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

नव्या सहायक सरकारी वकिलांचे स्वागत

सरकारी वकील म्हणून काम करीत असताना एकीकडे जनतेचा रोष, तर दुसरीकडे सरकारी उत्तरदायित्व अशी दुहेरी जबाबदारी पार पाडायची असते़. सरकारची बाजू मांडत असतानाच पीडितांना न्याय कसा मिळेल यासाठी सरकारी वकिलाने आपल्या कायद्याच्या ज्ञानाचा उपयोग करावयाचा असतो!' असे मत अध्यक्ष ॲॅड. गौरव वाळुंज यांनी नुकतेच व्यक्त केले. 

पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू झालेल्या सहायक सरकारी वकिलांचा पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने फुलांचे रोपटे देऊन स्वागत आणि सन्मान करण्यात आला. त्या वेळी असोसिएशनचे अध्यक्ष यांनी मत मांडले. न्यायालयात सहाय्यक सरकारी वकील म्हणून ॲॅड. पूजा काळे, ॲॅड. पूजा इंगळे, ॲॅड. प्राजक्ता पिसाळ, ॲॅड. क्रांती कुरळे व ॲॅड. रूपाली साखरकर हे नव्याने रुजू झाले आहेत.

यावेळी असोसिएशनच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.. कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे सचिव ॲॅड. उमेश खंदारे, महिला सचिव ॲॅड. रिना मगदुम,  खजिनदार ॲॅड. अक्षय फुगे, सदस्य ॲॅड. संकेत सरोदे, सदस्य ॲॅड. विकास शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन सचिव ॲॅड. उमेश खंदारे यांनी केले; तर आभार ॲॅड. अक्षय फुगे यांनी मानले.

Share this story

Latest