Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा आगीत चार जखमी

पिंपरी चिंचवड: आकुर्डी गावठाण येथे आज शुक्रवार (१९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएम (YCM) मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा आगीत चार जखमी

आग स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले

पिंपरी चिंचवड: आकुर्डी गावठाण येथे आज शुक्रवार (१९ जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास एका भंगारच्या दुकानाला आग लागली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित वायसीएम (YCM) मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. ही आग स्वयंपाक करत असताना गॅस गळतीमुळे लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तळवडे मध्ये नुकत्याच लागलेल्या आगीत १४ महिलांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर एका महिलेसह कारखाना मालक जखमी झाला होता. त्यानंतर पुन्हा आगीची घटना घडली आहे. तसेच तीन महिन्यांपूर्वी शाहूनगर भागात आगीच्या घटनेत चार जणांच्या कुटुंबाचा होरपळून मृत्यू झाला आहे. (Pimpri Chinchwad News)

पोपट अडसूळ (वय 50) संतोष चनल (वय 45 ) श्रीकांत कांबळे (वय 32) नरेश चव्हाण (वय 38) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्राधिकरण उप प्राधिकरण केंद्र थेरगाव पिंपरी येथील चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या घटनास्थळी अक्षय स्क्रॅप सेंटर या भंगारच्या दुकानाला आग लागली होती यामध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, प्लास्टिक स्क्रॅप, परफ्युम बॉडी स्प्रे त्यांचे रिकामे कॅन ,भंगार बॅटरी,घरगुती भंगार प्लास्टिक वस्तू आधी गोष्टी आगीमध्ये जळून खाक झाले आहेत.

भंगारच्या दुकानांमध्ये छोट्याशा पत्राच्या खोलीमध्ये या चार व्यक्ती राहत होत्या यावेळी स्वयंपाक करत असताना गॅसची मोठ्या प्रमाणात गळती झाल्याने त्या गॅसचा मोठा भडका उडाला. हा आवाज एवढा मोठा होता की परिसरात या आवाजामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. यानंतर त्वरित अग्निशमन दल तेथे दाखल झाले व त्यांनी पाण्याचा फवारा मारत या त्वरित विजवली. यावेळी जखमी व्यक्तींना रिक्षा द्वारे त्वरित वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आले हे कामगिरी करण्यासाठी एकूण 32 अग्निशमन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story