File Photo
मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र शोधता यावे तसेच अन्य शंकाचे निरसन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत क्षेत्रीय कार्यालयनिहाय ‘आपले मतदान केंद्र जाणून घ्या-‘नो युवर पोलींग स्टेशन’ कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली आहे.
महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयात नियंत्रण अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र ‘नो युवर पोलींग स्टेशन’ कक्ष्ा स्थापन करण्यात आले असून कक्षाचे कामकाज कार्यालयीन मतदान प्रक्रिया संपेपर्यंत सुरू राहील. ‘अ’: भेळ चौक, निगडी प्राधिकरण, नियंत्रण अधिकारी- शितल शिंदे, कर्मचारी- माया जाधव, योगेश भांगले, क्षेत्रीय कार्यालय ‘ब’: लिंकरोड, एल्प्रो मॉल जवळ, चिंचवड, नियंत्रण अधिकारी- अमित पंडीत, कर्मचारी- अवण्णा कोळी, पल्लवी बेलसरे, क्षेत्रीय कार्यालय ‘क’: नेहरूनगर,भोसरी, नियंत्रण अधिकारी- तानाजी नरळे, कर्मचारी- माधवी चौगुले, शुभांगी साळी, क्षेत्रीय कार्यालय ‘ड’ औंध-रावेत बीआरटी रोड, रहाटणी, नियंत्रण अधिकारी- श्रीकांत कोळप, कर्मचारी- बाबासाहेब हिवराळे, श्रद्धा शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालय ‘ई’ पत्ता ग्रोथ लॅब बिल्डींग, पांजरपोळसमोर, भोसरीसाठी नियंत्रण अधिकारी-राजेश आगळे, कर्मचारी- शितल थोरात, गोविंद पखाले, क्षेत्रीय कार्यालय ‘फ’ लोकमान्य टिळक चौक, निगडी, नियंत्रण अधिकारी- सिताराम बहुरे, कर्मचारी- रमा बहिरवाडे, शेख आशु, क्षेत्रीय कार्यालय ‘ग’ दिलिप वेंगसरकर क्रिकेट ॲकेडमी, थेरगाव, नियंत्रण अधिकारी-किशोर ननवरे, कर्मचारी-सुमेध कांबळे, आकाश आगळे, क्षेत्रीय कार्यालय ‘ह’ महिला आयटीआय, कासारवाडी, नियंत्रण अधिकारी-उमेश ढाकणे, कर्मचारी-पुकराज शिंदे, समता ओंकार यांची नियंत्रण अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.