जैन समाजाला आपल्यासारख्या उच्च विद्याविभूषित प्रतिनिधीची आवश्यकता : ईशदर्शनाजी म. सा.
जैन समाजाच्या समस्या आणि प्रश्न समजून घेणारा उच्चविद्याविभूषित लोकप्रतिनिधी पिंपरी विधानसभा मतदार संघामध्ये निवडून येणे आवश्यक आहे. या परिसरात जैन समाजाचे संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असून आपल्यासारख्या उच्चविद्याविभूषित प्रतिनिधी निवडून आल्यास त्याचा जैन समाजाला खूप उपयोग होईल. अशी प्रतिक्रिया जैन साध्वी इशदर्शनजी म. सा. यांनी व्यक्त केली.
पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज त्यांच्या मतदारसंघात येणाऱ्या चिंचवड परिसरात प्रचार फेरी काढली होती त्यावेळी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ व कल्याण प्रतिष्ठान यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मास उपक्रमात सहभागी झालेल्या जैन साध्वींचे दर्शन घेतले.
यावेळी अतिशय प्रखर वक्त्या म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या इशदर्शनजी म. सा. यांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. जर सर्वसामान्य जनतेची चांगल्या पद्धतीने सेवा करावयाची असेल तर सभागृहात सुशिक्षित व्यक्तीचीच निवड झाली पाहिजे. लोकांनी निवडून दिलेला प्रतिनिधी सुशिक्षित असेल तर त्याला लोकांचे प्रश्न व समस्या समजू शकतात व तो त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू शकतो. असे सांगत इशदर्शनजी म्हणाल्या की, डॉ. सुलक्षणा शिलवंत या सभागृहात जाणे आवश्यक असल्याने त्या नक्की विजयी होतील.
श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघात आयोजित करण्यात आलेल्या चातुर्मासात उज्वलकुमारजी म.सा. यांच्या शिष्या व भारत माता प्रवर्तीनी प. पू. श्री प्रमोदसुधाजी म. सा. यांच्या गुरु भगिनी उपप्रवर्तिनी डॉ. प. पू. प्रियदर्शनाजी म. सा. ज्ञानआराधिका व संघटन प्रिय डॉ. प. पू. प्रणवदर्शनाजी म. सा. व मधुर तसेच प्रखर वाक्त्या प. पू. ईशदर्शनाजी म. सा. या जैन साध्वी उपासनेसाठी आलेल्या आहेत. डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी आज या तीनही जैन साध्वींचे दर्शन घेतले त्यावेळी तिघींनीही सुलक्षणा शिलवंत यांना विजयी होणार असे आशीर्वाद दिले.