Pimpri Chinchwad News : कचरा डेपो हटाव, पुनावळे बचाव कचरा डेपोच्या विरोधात हजारो नागरिकांची बाईक रॅली

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेकडून (PCMC) पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन (Solid waste management) प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Avchite
  • Sun, 5 Nov 2023
  • 05:34 pm
Pimpri Chinchwad News

कचरा डेपो हटाव, पुनावळे बचाव कचरा डेपोच्या विरोधात हजारो नागरिकांची बाईक रॅली

पिंपरी: पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेकडून (PCMC) पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन (Solid waste management) प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. असे नागरिकांचे म्हणणे असून हा प्रकल्प रद्द करण्यात या मागणीसाठी पुनावळेतील हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरत बाईक रॅली काढली. 

पिंपरी चिंचवड महापालिकेला पुनावळे येथील वन विभागाने २६ हेक्टर जमीन हस्तांतरित केलेली आहे. या जमीनीवर सन 2008 मध्ये कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले. कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला असल्याने या जागेवर महापालिकेकडून कचरा डेपो बांधण्यात येणार आहे. मात्र या परिसरातील लोकसंख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. येथे कचरा डेपो झाल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होईल, अशी भीती येथील नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे कचरा डेपोचे आरक्षण रद्द करण्याची मागणी  करण्यासाठी पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत, मारुंजी, जांबे या गावातील ग्रामस्थ व आजूबाजूच्या सोसायट्यांमधील रहिवाशांना सोबत घेऊन विरोध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आली. यावेळी आमदार अश्वीनी जगताप, को-ल ऑपरेटीव्ह हासिंग असोसिएशन, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तसेच यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

कचरा डेपोला स्थानिक नागरिकांचा मोठा विरोध आहे. गेल्या पंधरा वर्षात या भागात विविध शैक्षणिक संस्था, रुग्णालय,  मोठ-मोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. जवळच हिंजवडी माहितीनगरी असल्याने देशभरातून आलेले नागरिक पुनावळे परिसरात स्थायिक झाले आहेत. मधेच हा कचरा डेपो उभारला तर दुर्गंधी पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरीक आक्रमक झाले आहेत. तसेच पुनावळे काटे वस्ती जंगलातील २८ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तोडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होईल. अशी भीती नागरिकांना आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ( मनसे ) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांची घेतली होती भेट...

पिंपरी चिंचवड महापालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला. हा प्रकल्प रद्द करण्यासाठी नागरिकांनी थेट मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर ठाकरे यांनी या प्रकल्पाची माहिती घेवून त्यावर अभ्यास केला जाईल. आणि त्यानंतर पुन्हा बैठक घेवू. त्यात पुढील दिशा ठरवू असे सांगितल्याचे नागरिकांनी सिवीक मिररला सांगितले. ठाकरे यांना भेटण्यासाठी पुनावळे, हिंजवडी, मारुंजीमधील ग्रामस्थ आणि मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे, गणेश सातपुते, शहर प्रमुख सचिन चिखले, राजु सावळे विशाल साळुखे, सतोष कवडे यांच्यासह आदी नागरिक  उपस्थित होते.  

म्हणून नागरिकांचा आहे विरोध...

- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला २००८ मध्ये मंजूरी देताना या भागात एवढ्या प्रमाणात नागरीकरण झाले नव्हते

- या परिसरात आता मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, रुग्णालये, गृहप्रकल्प उभारले गेले आहेत. प्रकल्पामुळे आता या सगळ्या गोष्टींवर गंभीर परिणाम होण्याची भीती 

- पुनावळे परीसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण सुरूआहे, सध्या सुमारे १ लाखाहून अधिक नागरिक राहत आहेत

- नैसर्गिक वातावरण आणि शेजारीच हिंजवडी आयटी पार्क 

- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका

- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा काही गृह प्रकल्पापासून केवळ दोनशे तीनशे मीटर अंतरावर आहे 

- नैसर्गिकरित्या लाभलेल सौंदर्य नष्ट होणार असून हा प्रकल्प जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्यात येणार आहे

- प्रकल्प हा पश्चिम दिशेला असून वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच वाकड , ताथवडे , हिंजवडी आय टी पार्क, मारुंजी, मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची शक्यता

महापालिकेने हा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, ही आमची मुख्य मागणी आहे. हा प्रकल्प उभारताना पर्यावरणाची मोठी हानी होणार आहे. तसेच भविष्यात मानवी जीवनावर याचा मोठा परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेने नागरिकांच्या भावनांचा त्यांच्या आरोग्याचा विचार करुन हा प्रकल्प रद्द करावा, 

 - प्रशांत अकर्ते, राहुल शिंदे, नागरिक

प्रकल्पाला मान्यता देताना भविष्यात वाढणाऱ्या लोकसंख्येचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. आता परिसरात मोठे नागरीकरण झालेले असताना तसेच मोठा विरोध असतानाही प्रकल्प उभारण्याचा घाट महापालिकेकडून घातला जात आहे. महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी खेळू नये. 

 - प्रितम कोहळे, गोरक्षक बेदारकर, नागरिक

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest