मुंबई बेंगलोर महामार्गावर रुग्णवाहिका उलटली
पिंपरी-चिंचवड: मुंबई बेंगलोर महामार्गावर किवळे येथे रुग्णवाहिका पलटली. ही घटना गुरुवारी (दि. 18) पहाटे घडली. (Pimpri Chinchwad News)
देहूरोड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका (एमएच 05/ईएल 2470) गुरुवारी पहाटे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. किवळे येथे मृणाल एक्झिट जवळ आल्यानंतर चालकाचा रुग्णवाहिकेवरील ताबा सुटला त्यामुळे रुग्णवाहिका उलटली. यामध्ये रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे.
यावेळी रुग्णवाहिकेमध्ये केवळ चालक होता. प्रसंगावधान राखत चालक रुग्णवाहिकेतून बाहेर पडला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. देहूरोड वाहतूक विभागाला घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याच्या बाजूला हा प्रकार घडला असून अपघातग्रस्त रुग्णवाहिका क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.