इम्रानखानच्या पक्षाने वाढवले हिंसाचाराचे राजकारण, पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी केला आरोप

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री अताउल्लाह तरदार यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षावर हिंसाचाराचे राजकारण वाढवल्याचा आरोप केला आहे.अताउल्ला म्हणाले की, पीटीआयची निदर्शने कधीही शांततापूर्ण नव्हती

Broadcasting,Minister, Ataullah Tardar,Prime Minister, Imran Khan

संग्रहित छायाचित्र

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारणमंत्री अताउल्लाह तरदार यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ  (पीटीआय) पक्षावर हिंसाचाराचे राजकारण वाढवल्याचा आरोप केला आहे.अताउल्ला म्हणाले की, पीटीआयची निदर्शने कधीही शांततापूर्ण नव्हती. पीटीआय कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये २६ नोव्हेंबर रोजी आधुनिक शस्त्रे, स्टेन गन, अश्रुधुर आणि ग्रेनेडसह हिंसाचार पसरवला. अताउल्ला यांनी ९ मे आणि २६ नोव्हेंबर हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस म्हणून वर्णन केले.

पीटीआयला मृतदेहांचे राजकारण करायचे आहे आणि देशात अशांतता पसरवून आपले राजकीय हित साधायचे आहे, असा आरोप अताउल्ला यांनी केला आहे. इम्रान यांचा पलटवार- सरकार जातीच्या आधारावर विभाजन करत आहे तुरुंगात असलेले पीटीआयचे संस्थापक इम्रान खान यांनी हिंसाचाराच्या आरोपांवर प्रत्युत्तर देत सरकारवर जातीच्या आधारावर देशाचे विभाजन केल्याचा आरोप केला. एक्सवर पोस्ट करताना इम्रानने लिहिले की, सरकार जातीच्या आधारावर पश्तूनांना लक्ष्य करत आहे.

इम्रानने लोकांना आवाहन केले की, या सरकारच्या 'फोडा आणि राज्य करा ' धोरणाचा कोणीही भाग बनू नये. आपण सर्व प्रथम पाकिस्तानी आहोत. याशिवाय इम्रानने सरकारला कायदेभंग आंदोलनाची धमकी दिली आहे.इम्रान यांनी सरकारसमोर दोन प्रमुख मागण्याही ठेवल्या आहेत. यातील पहिली म्हणजे गेल्या वर्षी ९ मे आणि यावर्षी २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी. दुसरी मागणी बेकायदेशीरपणे तुरुंगात डांबलेल्या पीटीआय कार्यकर्ते आणि नेत्यांची सुटका करावी.

२६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात चार पोलिसांसह सात जणांचा मृत्यू झाला होता.   इम्रानच्या पक्षाचे नेते आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर म्हणाले की, कायदेभंग आंदोलन मी नव्हे तर इम्रान खान यांनी पुकारले आहे. संपूर्ण माहिती मिळाल्यावर त्यावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही इम्रान यांच्या आदेशाचे पालन करू. आमचे प्राधान्य चर्चेला आहे, मात्र सरकारला ताकद दाखवावी लागेल.

पीटीआयचे नेते आणि नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते उमर अयुब यांनी सोमवारी (दि. १६) सांगितले की, राजकीय संकट सोडवण्यासाठी पक्ष कोणाशीही चर्चा करण्यास तयार आहे. सरकार आणि पीटीआय यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढत आहे. याकडे पुन्हा एकदा पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest