जॉर्जियामध्ये ११ भारतीयांचा गुदमरून मृत्यू

जॉर्जियातील गुडौरी येथील स्की रिसॉर्टमध्ये सोमवारी ११ भारतीयांसह १२ जणांचा मृत्यू झाला. १२ वी व्यक्ती जॉर्जियाची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत झोपले होते.

संग्रहित छायाचित्र

हॉटेलच्या खोलीत कार्बन मोनोऑक्साइड गॅसची झाली गळती

त्बिलिसी : जॉर्जियातील गुडौरी येथील स्की रिसॉर्टमध्ये सोमवारी ११ भारतीयांसह १२ जणांचा मृत्यू झाला. १२ वी व्यक्ती जॉर्जियाची आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण रिसॉर्टच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत झोपले होते. कार्बन मोनॉक्साईड गळतीमुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.

जॉर्जियाचे गृह मंत्रालयाने या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. सीएनएननुसार, कामगारांच्या बेडजवळ एक जनरेटर सापडला होता. कदाचित वीज गेल्यानंतर तो चालू करण्यात आला. त्यातूनच वायुची गळती झाली. मृतांची ओळख अद्याप जाहीर केलेली नाही.

सध्या गुडौरी येथे रात्रीच्या वेळी तापमान उणे १५ अंशापर्यंत जाते. हीटरशिवाय येथे रात्र घालवणे जीवघेणे ठरू शकते. यामुळेच येथे राहणारे लोक खोलीत उष्णतेची व्यवस्था करतात. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासात त्याच्या शरीरावर मारहाणीच्या किंवा जखमेच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाही.

जॉर्जियाची राजधानी त्बिलिसी येथे असलेल्या भारतीय दूतावासाने या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. दूतावासाने सांगितले की, 'मृतदेह लवकर भारतात पाठवता यावेत, यासाठी आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत.'

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest