Cancer Vaccine : रशियाची कॅन्सरवरील लस अडीच लाख रुपयांना; पुन्हा लागण होण्याचा धोका नाही

मॉस्को : रशियाच्या कर्करोगावरील लसीच्या घोषणा केल्यानंतर जगभरातील कर्करोगाच्या या लसीची किंमत किती असेल याविषयी उत्सुकता होती. रशियाची ही लस २.५ लाख रुपयांना मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Sat, 21 Dec 2024
  • 07:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लवकरच आणखी एक लस करणार जाहीर

मॉस्को : रशियाच्या कर्करोगावरील लसीच्या घोषणा केल्यानंतर जगभरातील कर्करोगाच्या या लसीची किंमत किती असेल याविषयी उत्सुकता होती. रशियाची ही लस २.५ लाख रुपयांना मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्करोग रुग्णांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रशियन नागरिकांना ही लस मोफत मिळणार आहे. मात्र, ही लस उर्वरित जगामध्ये कधी उपलब्ध होणार याबाबत कपरिन यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.

रशियन आरोग्य मंत्रालयाच्या रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटरचे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांच्या म्हणण्यानुसार, ही रशियन कर्करोगाची लस वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णांसाठी वेगळ्या पद्धतीने बनवली जाईल. कॅप्रिन म्हणाले की ही लस प्री-क्लिनिकल चाचण्यांमध्ये प्रभावी ठरली आहे. यामुळे ट्यूमरची वाढ मंदावते आणि ८० टक्क्यांपर्यंत घट दिसून येते. ही लस रुग्णांच्या ट्यूमर पेशींच्या डेटावर आधारित एका विशेष कार्यक्रमाद्वारे तयार केली गेली आहे.

रशियाच्या फेडरल मेडिकल बायोलॉजिकल एजन्सीच्या प्रमुख वेरोनिका स्वोरोत्स्कोवा यांनी मेलेनोमा (त्वचेचा कर्करोग) विरुद्ध लस कसे कार्य करते हे स्पष्ट केले आहे. सर्व प्रथम, कर्करोगाच्या रुग्णाकडून कर्करोगाच्या पेशींचा नमुना घेतला जातो. यानंतर, शास्त्रज्ञ या ट्यूमरच्या जनुकांची क्रमवारी लावतात. याद्वारे कर्करोगाच्या पेशींमध्ये तयार होणारी प्रथिने ओळखली जातात. प्रथिने ओळखल्यानंतर वैयक्तिक एमआरएनए लस तयार केली जाते. टी पेशींना दिलेली कर्करोगाची लस शरीराला टी पेशी बनवण्याचा आदेश देते.

या टी पेशी ट्यूमरवर हल्ला करतात आणि कर्करोग नष्ट करतात. यानंतर, मानवी शरीर ट्यूमर पेशींना ओळखू लागते, ज्यामुळे कर्करोग पुन्हा परत येत नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील कॅन्सर तज्ज्ञ इलियास सयुर यांच्या मते, या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या लसीने मेंदूच्या कर्करोगावर ४८ तासांपेक्षा कमी कालावधीत परिणाम दिसून आला.

रशियन आरोग्य मंत्रालयाच्या नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटरच्या वेबसाइटनुसार, कर्करोगाशी लढण्यासाठी दोन प्रकारचे संशोधन केले जात होते. यातील पहिली mRNA लस आहे आणि दुसरी ऑन्कोलिटिक व्हायरोथेरपी आहे.

या थेरपीअंतर्गत, कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य केले जाते आणि प्रयोगशाळेत सुधारित मानवी विषाणूंद्वारे संक्रमित केले जाते. यामुळे विषाणू कर्करोगाच्या पेशींमध्ये स्वतःला वाढवतात. परिणामी कर्करोगाच्या पेशी नष्ट होतात. म्हणजेच या थेरपीमध्ये ट्यूमर थेट नष्ट करण्याऐवजी रोगप्रतिकारशक्ती सक्रिय करून कर्करोगाच्या पेशी नष्ट केल्या जातात.

या थेरपीसाठी बनवल्या जाणाऱ्या लसीचे नाव एन्टरोमिक्स आहे. या लसीची रिसर्च सायकल पूर्ण झाली आहे. लवकरच त्याची घोषणा होऊ शकते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest