संग्रहित छायाचित्र
मॉस्को : रशियातील कझान शहरात शनिवारी सकाळी अमेरिकेतील ९/११ सारखा हल्ला झाला. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने कझानमध्ये ८ ड्रोन हल्ले केले, त्यापैकी ६ निवासी इमारतींवर झाले. हा हल्ला मॉस्कोपासून ८०० किलोमीटर अंतरावर झाला. आतापर्यंत या हल्ल्यात कोणीही मारले गेल्याचे वृत्त नाही.
या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अनेक ड्रोन इमारतींवर आदळताना दिसत आहेत. या हल्ल्यांनंतर रशियाचे दोन विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
२००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने ४ विमानांचे अपहरण केले होते. यापैकी ३ विमाने अमेरिकेतील ३ महत्त्वाच्या इमारतींवर एकामागून एक कोसळली. पहिला अपघात रात्री ८.४५ मिनिटांनी झाला. बोईंग ७६७ हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर वेगाने आदळले. १८ मिनिटांनंतर, दुसरे बोईंग ७६७ इमारतीच्या दक्षिण टॉवरवर आदळले.
४ महिन्यांपूर्वी रशियावर असाच हल्ला झाला होता. युक्रेनने रशियातील सेराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या ३८ मजली निवासी इमारतीला लक्ष्य केले होते. रशियाचा स्ट्रॅटेजिक बॉम्बर लष्करी तळही येथे आहे. या हल्ल्यात ४ जण जखमी झाले आहेत. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर १०० मिसाईल आणि १०० ड्रोन डागले. यात सहा जणांचा मृत्यू झाला असून दीडशेहून अधिक जण जखमी झाले आहेत.
अवघ्या चार दिवसांपूर्वी रशियाचे अण्वस्त्र प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मंगळवारी मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. हल्ल्याच्या वेळी, किरिलोव्ह अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. यामध्ये किरिलोव्हसोबत त्यांचा सहाय्यकही मारला गेला.
वृत्तसंस्था रॉयटर्सने युक्रेनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले होते की, किरिलोव्हची हत्या युक्रेननेच केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सी (एसबीयू) शी संबंधित एका सूत्राने याची जबाबदारी घेतली होती.
दोनच दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे सांगितले होते. यासाठी ते ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार आहेत. पुतिन म्हणाले की, त्यांच्यामध्ये चार वर्षांहून अधिक काळ चर्चा झालेली नाही, पण ट्रम्प यांची इच्छा असेल तर ते त्यांना भेटण्यास तयार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायडेन सरकार लवकरच युक्रेनसाठी शेवटचे सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह पॅकेज जाहीर करेल. अंदाजानुसार, युक्रेनला १.२ बिलियन डॉलरचे पॅकेज दिले जाईल. मात्र, खरी रक्कम जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.