गंभीरसाठी आता अस्तित्त्वाची लढाई; ऑस्ट्रेलिया दौरा ही शेवटची संधी?

मुंबई : न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत ०-३ असा लाजिरवाणा पराभव झाला. हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला आहे. बीसीसीआयकडून या पराभवाची गंभीर दखल घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

कसोटी संघाची सूत्रे व्ही.व्ही.एस. लक्ष्मणाकडे सोपवली जाण्याची शक्यता

मुंबई : न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत ०-३ असा लाजिरवाणा पराभव झाला. हा पराभव प्रचंड जिव्हारी लागला आहे. बीसीसीआयकडून या पराभवाची गंभीर दखल घेतली जाईल, असे संकेत मिळत आहेत. टीमच्या खेळाडूंसोबतच प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण व्यवस्थापनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

भारतीय टीम आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दरम्यान हा ऑस्ट्रेलिया दौरा गौतम गंभीरसाठी स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असेल. भारतीय टीमने चांगले प्रदर्शन केले नाही, तर बीसीसीआय गंभीरच्या विरोधात कठोर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

टी-२० वर्ल्ड कप विजयानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ समाप्त झाला. त्यानंतर आयपीएलमधील प्रदर्शन लक्षात घेऊन बीसीसीआयने गौतम गंभीरला संघाचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.  पण गंभीरने सूत्र स्वीकारल्यापासून टीम इंडियाची स्थिती बिघडली आहे. श्रीलंकेत वनडे सीरीज गमावली. त्यानंतर टीम इंडियाला घरच्या मैदानात कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. बीसीसीआय आता दोन्ही फॉर्मेटमध्ये वेगवेगळे कोच नियुक्त करण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्यानुसार गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहील, पण रेड आणि व्हाइट बॉल  फॉरमॅटमध्ये वेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाऊ शकते. हा निर्णय भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरीजमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाल्यास गंभीरकडून कसोटीची सूत्र काढून घेतली जातील. त्याजागी व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांची नियुक्ती होऊ शकते. वनडे आणि टी-२० मध्ये गंभीरच मुख्य प्रशिक्षक  असेल. लक्ष्मण सध्या भारताच्या टी-२० टीमसोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला आहे. याआधीही लक्ष्मण टी-२० टीमसोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. 

बैठकीत समोर आले मतभेद
मुंबई टेस्टमध्ये भारतीय टीमचा अवघ्या तीन दिवसात पराभव झाला. त्यासोबतच मालिका ०-३ ने गमावली. या लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआयने कॅप्टन रोहित शर्मा, हेड कोच गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी रँक टर्नर पीचची मागणी आणि जसप्रीत बुमराहला शेवटच्या टेस्टसाठी विश्रांती देण्याच्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आले. रोहित शर्मासोबत गौतम गंभीरची कोचिंग आणि टीम सिलेक्शनबद्दल चर्चा झाली. टीम मॅनेजमेंटचे काही सदस्य आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यात सिलेक्शनवरुन काही मतभेद असल्याचे समोर आले.  तिघांना बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या प्लानिंगबद्दल विचारण्यात आले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story