पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections)उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे फक्त चारच लोक राहतील. तर शरद पवार(Sharad Pawar) यांच्यासोबतही किंचित लोक राहतील, अशीफटकेबाजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrasekhar Bawankule) यांनी बुधवारी (दि. ११) केली.
पुढच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यात दिसेल. येत्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला उमेदवारदेखील मिळणार नाही, असा दावादेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
‘‘मुंबईमध्ये २८ पक्ष मोदींना हरवण्याकरिता एकत्र आले. मात्र पनवेलमध्ये लोक मतदान मोदींना करणार आहेत. पनवेलमधील जनतेचं मत मोदींच्या बाजूने आहे. ४४० चा करंट पनवेलची जनता महाविकास आघाडीला देणार आहे. पनवेलमध्ये भाजपला ६० हजार व्यक्तींच्या घरी जायचे आहे,’’ असे बावनकुळे यांनी पनवेल शहरात ‘घर घर चलो संपर्क अभियान’ आणि ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान कार्यक्रमात बोलताना सांगितले. या अभियानात बावनकुळे यांच्यासोबतच पनवेल, उरण, कर्जत या तिन्ही विधानसभेतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
‘‘तुमच्यासारखे कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे. अनेक सामान्य लोकांना भेटलो मात्र सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. सध्या लोकांना विचारले की पंतप्रधान कोण पाहिजे? तर त्यांचे उत्तर मोदी हेच असते. काँग्रेसने केलेली पाप पंतप्रधान मोदींनी धुवून काढली आहेत,’’ असा टोलाही बावनकुळे लगावला आहे.