समाजसेवेतून निर्माण झाले जनमान्य नेतृत्व; भोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दत्तात्रय दगडे पाटील

भोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दत्तात्रय दगडे-पाटील यांच्याकडे उमदे राजकीय व्यक्तिमत्त्व, समाजसेवक आणि सांस्कृतिक प्रवर्तक म्हणून पाहिले जाते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 18 Nov 2024
  • 01:58 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

भोर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किरण दत्तात्रय दगडे-पाटील यांच्याकडे उमदे राजकीय व्यक्तिमत्त्व, समाजसेवक आणि सांस्कृतिक प्रवर्तक म्हणून पाहिले जाते. त्यांनी स्थानिक पातळीवरील कामांपासून ते मोठ्या प्रमाणावर केलेल्या समाज सेवेपर्यंत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्यामुळेच, त्यांचे जनमानसात विशेष स्थान निर्माण झाले आहे. हिंदू समाजाच्या हितासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले असून त्यांच्या या योगदानामुळे त्यांना जनाधार मिळत असल्याचे चित्र दिसते आहे.

राजकीय कारकीर्द
किरण पाटील यांनी पुणे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. भोर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे. सन २०१७ ते २०२२ या कालावधीत ते नगरसेवक होते आणि त्यांनी शहर सुधारणा समितीचे उपाध्यक्ष आणि बीडीपी समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. याशिवाय, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) सक्रिय सदस्य म्हणूनही त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. बावधन बुद्रुकचे उपसरपंच व सरपंच या पदांवर कार्य करत त्यांनी स्थानिक प्रशासनात आपली ओळख निर्माण केली.

विकास प्रकल्प
भोर, मुळशी आणि राजगड (वेल्हे) तालुक्यांसाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आखणी केली आहे. यात एमआयडीसी औद्योगिक प्रकल्प, दुर्ग रायरेश्वर मंदिराचा पुनर्विकास, ऐतिहासिक वारशाचे जतन, तसेच आधुनिक क्रीडा संकुलांचा समावेश आहे.

-भोर: औद्योगिक विकास, ऐतिहासिक स्मारकांचे जतन, व आधुनिक क्रीडा सुविधा.

-मुळशी: वाहतूक व्यवस्थापन, पाणीपुरवठा सुधारणा व रोजगार निर्मिती.

-राजगड: पर्यटन केंद्र म्हणून विशेष दर्जा व स्पर्धा परीक्षा केंद्र उभारणी.

सामाजिक कार्य
-काशी यात्रा: १२ हजार नागरिकांना काशी यात्रा घडवून आणत त्यांनी “आधुनिक श्रावणबाळ” म्हणून ओळख निर्माण केली.

-दिवाळी फराळ किट्स: ६६ हजार कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करून आनंद साजरा केला.

-महिला सक्षमीकरण: 'गृह मंत्री' कार्यक्रमाद्वारे १० हजार महिलांना स्वतःची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

क्रीडा आणि सांस्कृतिक योगदान:
-क्रीडा सुविधा: राजाराम शिवछत्रपती क्रीडा संकुल, स्केटिंग ट्रॅक, टेनिस कोर्ट, ओपन जिम यांसारख्या अत्याधुनिक सुविधांची निर्मिती केली.

-सांस्कृतिक वारसा: महालक्ष्मी व संत बाळुमामा यात्रा, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपट निर्मिती आणि धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे सांस्कृतिक जतनात योगदान दिले.

-किरण पाटील यांनी केलेला विकास, समाजसेवा आणि सांस्कृतिक योगदान यातून प्रगल्भ राजकीय व्यक्तिमत्त्वाची प्रचिती येते. भोर मतदारसंघातील नागरिकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. 

आरोग्य सेवा
कोविड काळात स्वतःच्या खर्चाने ७५ खाटांचे कोविड सेंटर सुरू करून अडीच हजार रुग्णांना उपचार दिले. बावधन पाणीपुरवठा प्रकल्पासाठी २३ कोटींची तरतूद करून पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाऊल उचलले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story