Yuva Sangharsh Yatra : तुळापूर येथून रोहित पवार यांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला सुरुवात!; शंभू महादेवाला घातले साकडे

युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh Yatra) सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj)समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (Tulapur)येथून करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Wed, 25 Oct 2023
  • 12:29 pm

तुळापूर येथून रोहित पवार यांच्या 'युवा संघर्ष यात्रे'ला सुरुवात

सैनिकी शाळेच्या शंभर मुलांनी काढलं रोहित पवारांचे चित्र; रोहित पवार भारावले!

युवा वर्गाच्या विविध प्रश्नांसाठी कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवा संघर्ष यात्रा (Yuva Sangharsh Yatra) सुरू केली आहे. यात्रेची सुरुवात छत्रपती संभाजी महाराजांचे (Chhatrapati Sambhaji Maharaj)समाधी स्थळ असलेल्या श्री क्षेत्र तुळापूर (Tulapur)येथून करण्यात आली. आज पहाटे साडेपाच वाजता संगमेश्वराच्या महादेवाला अभिषेक घालून साकडे घालून रोहित पवार यांनी या यात्रेला सुरुवात केली.

ही यात्रा तुळापूर मार्गे फुलगाव वरून वढू बंधाऱ्यावरून पुढे आली. दरम्यान पदयात्रेच्या मार्गावरील सैनिकी शाळेतील शंभर मुलांनी रोहित पवार यांचे चित्र काढून रोहित पवार यांच्या युवा यात्रेला युवा संघर्षा यात्रेला पाठिंबा दिला. या मुलांनी काढलेल्या चित्राने रोहित पवारही भारावले.

दरम्यान युवा संघर्ष यात्रेचा हा शिरूर हवेली तालुक्यातील पहिला प्रवासाचा टप्पा आहे. आज यात्रेचा पहिला दिवस होता. दररोज 17 ते 22 किलोमीटर अंतर ही पदयात्रा कापणार आहे. 45 दिवस ही पदयात्रा असून, ही यात्रा नागपूर येथे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान पोहोचणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest