Supriya Sule : शैक्षणिक परिसरात राजकारणाचे खेळ सत्ताधारी पक्षाला शोभत नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वादावर सुप्रिया सुळे यांची टीका

पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 4 Nov 2023
  • 11:10 am
Supriya Sule

संग्रहित छायाचित्र

पुणे : पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर सुळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, 

भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने मुलांना मारहाण केली याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का?याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा. विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी निषेध म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला होता.  यावेळी स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाच्या चार विद्यार्थ्यांना मारहाण  करण्यात आली होती. यामुळे विद्यापीठातील वातावरण तापले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest