पुण्यातून राजकारणाची सर्व सुत्रे हालतात – पंकजा मुंडे

पुणे हे सांस्कृतीक राजधानी आहे. पुण्यात माझे जंगी स्वागत झाले. काही दोन, तीन ठिकाणी लोकांना स्वागत करता आले नाही. त्याबाबत त्यांनी परस्पर निरोप दिले होते. आज पुण्यातून पुढच्या प्रवासासाठी निघत आहे, अशी माहीती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 6 Sep 2023
  • 02:42 pm
Pankaja Munde : पुण्यातून राजकारणाची सर्व सुत्रे हालतात – पंकजा मुंडे

पुण्यातून राजकारणाची सर्व सुत्रे हालतात – पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांचे हडपसर येथे जंगी स्वागत

पुण्याला महाराष्ट्रात महत्वाचे स्थान आहे. राजकारणाची सर्व सुत्रे पुण्यातूनच हालतात. पुणे हे सांस्कृतीक राजधानी आहे. पुण्यात माझे जंगी स्वागत झाले. काही दोन, तीन ठिकाणी लोकांना स्वागत करता आले नाही. त्याबाबत त्यांनी परस्पर निरोप दिले होते. आज पुण्यातून पुढच्या प्रवासासाठी निघत आहे, अशी माहीती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. पुण्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या.

भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू आहे. पुण्यात यात्रेदरम्यान आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, जालन्यातील घटनेची सखोल आणि निःपक्षपाती चौकशी झाली पाहिजे. आता नुसती आश्वासने नकोत, तर पोटातून भावना करून एखाद्याने नेतृत्त्व स्वीकारले पाहिजे. तसेच मराठा समाजाला आरक्षण कसे आणि किती मिळणार हे ठोक ताळे सांगणारा आश्वासित असा चेहरा समोर आला पाहिजे.

पुढे त्यांना, देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीमुळे सत्ताधारी केंद्र सरकारकडून सर्व ठिकाणी भारत करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “तुम्ही इंडियात राहता की भारतात? आपले नाव भारत आहे आणि इंडिया हे झाले आहे. बॉम्बेच मुंबई होऊ शकते, तर इंडिया भारत ही एक चर्चा असून त्यावर काही तरी निर्णय होईल. तसेच आपण दोन्हीमध्ये राहत नसून त्या काळात कॉलनियन लोकांनी दिलेल नाव आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest