Sanjay Kakade : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना महापालिकेचा दणका

भाजपा नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने नोटीस दिली आहे. हे बांधकाम येत्या ३० दिवसांत काढून घेण्यात यावे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Fri, 13 Oct 2023
  • 09:43 am
Sanjay Kakade

संग्रहित छायाचित्र

अनाधिकृत बांधकाम 30 दिवसांत काढून घेण्याची नोटीस ; अन्यथा बांधकाम पाडण्याचा इशारा

पुणे: भाजपा नेते आणि माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी (Unauthorized constructions) महापालिकेच्या (pmc pune) बांधकाम विकास विभागाने नोटीस दिली आहे. हे बांधकाम येत्या ३० दिवसांत काढून घेण्यात यावे. अन्यखा महापालिकेकडून पाडण्यात येईल, असा थेट इशारा पालिकेने दिला आहे.

काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बांधकामाबाबत माहिती अधिकारातून माहिती मागविण्यात आली होती. मात्र माहिती देण्यास पालिककेडून टाळाटाळ करण्यात येत होती. असा आरोप तक्रारदाराने केला होता. त्यानंतर पालिकेने याची दखल घेत कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. यात दुसऱ्या मजल्यावर विनापरवाना २५१ चौ. मी व तिसऱ्या मजल्यावरील ४२० चौ. मी. चे संपूर्ण बांधकाम अनाधिकृत असल्याचे पंचनाम्यात समोर आले आहे. याप्रकरणी 30 दिवसांत सदरील बेकायदेशीर बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात येईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे.

माजी खासदार संजय काकडे यांच्या मालकीच्या कर्वेनगर येथील काकडे पॅलेस मंगल कार्यालयाच्या बेकायदेशीर बांधकामासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याप्रकरणी तक्रारदार योगेश कदम यांनी दोन दिवसापूर्वी नव्याने निवेदन देत काकडे पॅलेसच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याची दखल घेत पालिकेच्या बांधकाम विकास विभागाने बुधवारी ( ता. ११ ) प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचासमक्ष मंगल कार्यालयाच्या बांधकामाचा पंचनामा केला. यामध्ये काकडे पॅलेस मंगल कार्यालयामध्ये बेकायदेशीररित्या तिसरा मजला बांधल्याचे दिसून आले.

 दरम्यान, काकडे यांच्या मालकीच्या या इमारतीचे बांधकाम तब्बल 20 वर्षापूर्वी करण्यात आले आहे, अशी चर्चा रंगली आहे. .या इमारतीचा व्यावसायिक वापर होत असल्याचे पालिकेने नमुद केले आहे. एकीकडे सामान्य नागरिकांच्या छोट्याशा पत्र्याच्या शेडवर, टपऱ्यांवर बेधडक कारवाई पालिकेकडून करण्यात येते. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या माजी खासदाराच्या अनाधिकृत बांधकामावर पालिका हातोडा चालवणार असा प्रश्न आता प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. तसेच महापालिकेच्या नोटीसाला खासदार काकडे कितपत प्रतिसाद देतात, याकडेही राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.  

30 दिवसांत बांधकाम पाडा अन्यथा कारवाई..

 पालिकेने बुधवारी ( ता. ११ ) माजी खासदार संजय काकडे यांना नोटीस काढली आहे. यामध्ये दिलेल्या तपशील नुसार मंगल कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील 251 चौ.मी चे बांधकाम, तसेच मंगल कार्यालयाचा तिसऱ्या मजल्यावरील संपूर्ण बांधकाम 420 चौ. मी असे एकूण 671 चौ. मी. चे बांधकाम बेकायदेशिर असल्याचे नमुद केले आहे. अनधिकृत बांधकाम 30 दिवसांत काढून घ्यावे, तसेच मिळकत पूर्ववत करावी, असे आदेश पालिकेने काकडे यांना दिले आहेत. अन्यथा पालिका प्रशासनातर्फे सदरील बांधकामावर कारवाई करण्यात येईल. यासाठी येणारा सर्व खर्च वसुल करण्यात येईल, असे नोटीसीमध्ये नमुद केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest