मराठ्यांनो शांततेच्या मार्गाने लढा द्या, कायदा हातात घेऊ नका, विकास पासलकर यांचे आवाहन
पुणे : भोर तालुका तसेच पुण्यातील कोथरूड आणि वारजे येथे काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये विकास पासलकर (Vikas Pasalkar) यांनी मराठ्यांना कायदा (Law) हातात न घेता शांततेच्या मार्गाने मोर्चा काढण्यासाठी सांगितले आहे. (Maratha Reservation)
पासलकर म्हणाले, मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी ३० वर्षापूर्वी मराठा आरक्षणाच्या बाबत आवाज उठवला होता. जरांगे पाटलांनी एक नवीन असा उत्साह निर्माण केलेला आहे आणि नवीन क्रांती निर्माण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर खऱ्या अर्थाने संपूर्ण मोर्चामध्ये महाराष्ट्रभर एक मराठा लाख मराठा ही घोषणा दिली जाते परंतु जरांगे पाटलांनी 25-30 वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाने ही केलेली घोषणा जरांगे पाटलांच्या झंझावाताने बदललेली आहे आणि आता मराठ्यांनी एक मराठा एक कोटी मराठा अशी घोषणा द्यायला पाहिजे.
पंधरा-वीस वर्ष आपल्या कुटुंबावरती तुळशी पत्र ठेऊन तो लढत आहे. साधे एक घर आहे . त्याच्या वरती साध्या पत्र्याचे पत्रे आहेत ते पण सिमेंटचे पत्रे आहेत अशा पद्धतीचा एक कार्यकर्ता , लढवय्या कार्यकर्ता जगाच्या इतिहासामध्ये नोंद करेल अशा पद्धतीच त्याने कार्य करून दाखविले. आपल्या समाजातील तरुणांनी कायदा हातात न घेता शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत जरांगे पाटील यांना पाठींबा द्यावा, असे आवाहन पासलकर यांनी केले.