रोहिणी खडसे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षपदी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आला आहे. विद्या चव्हाण यांच्या जागी रोहिणी खडसे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच बीड जिल्ह्यातील बबन गिते यांची राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार गटाकडून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. बबन गिते यांनी धनंजय मुंडे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना ही संधी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
तर रोहिणी खडसे यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कन्या म्हणून ओळख आहे. २०१९ मधील विधानसभेत अवघ्या १८०० मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यानतंर कोरोना काळात रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता रोहिणी खडसे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे शरद पवार गटाकडून जाहीर करण्यात आले आहे.