अजित पवारांकडून भल्या पहाटे विकास कामांची पाहणी
पुणे : (Pune) राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांनी सूत्र हातात घेतल्यापासून त्यांनी पुण्यामध्ये बैठकांचा धडाका लावला आहे. अजित पवार हे कामाच्या आणि वेळेच्या बाबतीत नेहमीच ॲक्टीवर असतात. आज देखील पुण्यातील नदी सुधार योजनेचे काम पाहण्यासाठी पहाटेच हजेरी लावली. त्यामुळे अधिकारी वर्गाची चांगलीच धांदल उडाल्याचे पहायला मिळाले. पत्रकारांच्या प्रश्नांना देखील भन्नाट उत्तर त्यांनी दिलं आहे.
तुम्ही सगळे पत्रकार झोपलेले असतात, सर्व नागरिक शांत झालेले असतात. त्यामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये हाच या मागचा उद्देश असल्याचे पवार म्हणालेत. उशिरा जर आलो तर सगळे नागरिक आपल्या आपल्या कामाला जातं असतात. मुलं-मुली शाळेत जातं असतात. त्यात आम्ही यायचं म्हंटल्यावर अधिकाऱ्यांच्या गाड्या माझा ताफा यामुळे इतरांना त्रास होऊ नये इतकंच माझं इतकंच माझं म्हणणं असतं. आपल्याला जी पाहणी करायची आहे ती करता हाच या मागचा उद्देश असल्याचे पवार म्हणालेत.
कंत्राटी भरतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सविस्तर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. त्यातून सगळी वस्तुस्थिती समोर आली आहे. आपल्या सरकारच्या काळात दिड.लाख नोकर भरतीचा निर्णय घेण्यात आला असून या अगोदर एवढ्या मोठी नोकरी भरती कुणाच्याच काळात झालेली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.