Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचे "मी पुन्हा येईन" दोन तासांनंतर डिलीट...!

भाजपने (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचा 'मी पुन्हा येईन ' हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुन्हा भूकंप होणार अशी चर्चा रंगली असतानाच दोन तासांनंतर तो व्हिडिओ डिलीट (Video) करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Amol Warankar
  • Sat, 28 Oct 2023
  • 09:49 am
Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस यांचे "मी पुन्हा येईन" दोन तासांनंतर डिलीट...!

पुणे : भाजपने (BJP) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांचा 'मी पुन्हा येईन ' हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्राच्या (Maharashtra) पुन्हा भूकंप होणार अशी चर्चा रंगली असतानाच   दोन तासांनंतर  तो व्हिडिओ डिलीट (Video) करण्यात आला आहे. 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत फारकत घेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात सत्ता स्थापन केली. त्यानंतर अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादीशी बंड करत शिंदे - फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले होते.  त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

 'महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन ' अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ भाजपच्या महाराष्ट्राच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र ही चर्चा सुरू असतानाच  भाजपकडून ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest