मशिदीमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल

लखनौ: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील एका मशिदीत नमाज पठण करायला आलेल्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 4 Sep 2024
  • 12:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

लखनौ: उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथील एका मशिदीत नमाज पठण करायला आलेल्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा व्हीडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. नमाज पठणादरम्यान ही हाणामारी झाल्याचे दिसत आशयाने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की दोन गट एकमेकांवर तुटून पडले आहेत. एकमेकांना कमरेच्या पट्ट्याने, सळई व काठीने मारत आहेत. संधी मिळेल तेव्हा समोरच्या गटातील लोकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. मुरादाबादमधील पकबडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात ही मशीद आहे. दरम्यान, या मारहाणीत एक डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तपास सुरू केला आहे.

या हाणामारीत अनेकांचे कपडे फाटले आहेत. ही घटना शुक्रवारच्या नमाज पठणावेळी घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र हाणामारी कशामुळे झाली ते अद्याप कळू शकलेले नाही. मशिदीसारख्या प्रार्थनास्थळी अशी घटना घडल्याचे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शुक्रवारची नमाज पठण करण्यासाठी पकबडा येथील मुस्लीम समुदाय मशिदीत जमला होता. सर्व लोक नमाज पठण करत असतानाच या हाणामारीला सुरुवात झाली. ही हाणामारी बराच वेळ चालली. मात्र कोणीही त्यांना थांबवले नाही. काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र त्यांनाही मार पडल्यानंतर ते बाजूला झाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest