यंदा देशभरात कडाक्याची थंडी; पावसाळा ऑक्टोबरपर्यंत लांबण्याची चिन्हे

नवी दिल्ली: यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरममध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो. यंदा प्रथम कडक उष्मा, त्यानंतर पावसाच कहर यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता हिवाळ्याबाबतही असाच दावा केला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Thu, 5 Sep 2024
  • 03:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

सप्टेंबरअखेरीस ला नीना सक्रिय होण्याची शक्यता

नवी दिल्ली: यंदा भारतात कडाक्याची थंडी पडू शकते. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरममध्ये ला निना सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाळा ऑक्टोबरपर्यंत वाढू शकतो. यामुळे यंदा कडाक्याच्या थंडीमुळे देशाच्या अनेक भागांमध्ये लोकांना त्रास होऊ शकतो. यंदा प्रथम कडक उष्मा,  त्यानंतर पावसाच कहर यामुळे नागरिक हैराण झाले असताना आता हिवाळ्याबाबतही असाच दावा केला जात आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, ला निना सप्टेंबरमध्ये सक्रिय होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यापासून जानेवारीपर्यंत यंदा कडाक्याची थंडी पडू शकते. ला निना मुळे सामान्यतः तापमानात घट होते. त्यामुळे हिवाळ्यातही जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हिवाळा अधिक लांब आणि तीव्र होतो. ला निनामध्ये पूर्वेकडील वारे समुद्राचे पाणी पश्चिमेकडे ढकलत असतात. त्यामुळे समुद्राचा पृष्ठभाग हा थंड होतो. आयएमडीचा अंदाज आहे की, सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ला निना सक्रिय होण्याची शक्यता ६६ टक्के आहे. तर हिवाळ्यात त्याच्या टिकून राहण्याची शक्यता ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ला निना परिस्थितीमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. यंदा भारतात १५ ऑक्टोबरला मान्सून संपणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटी दक्षिण भारतात येणाऱ्या ईशान्य मान्सूनवरही याचा परिणाम होऊ शकतो.

१ जून ते १ सप्टेंबर दरम्यान आठ राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. या कालावधीत देशभरात सात टक्के अधिक पाऊस झाला आहे. नागालँड आणि मणिपूरमध्ये सर्वात कमी पाऊस झाला आहे. येथे २८ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर बिहार, पंजाब आणि चंदीगडमध्ये २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. देशातील एक चतुर्थांश जिल्ह्यांमध्ये कमी किंवा फार कमी पाऊस झाला आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल झाला, पण जूनमध्ये कमी पाऊस झाला. जुलै आणि ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाला. मध्य पूर्व भागात कमी पाऊस पडत आहे आणि आता जास्त पाऊस पडू शकतो. त्याचे कारण म्हणजे ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. पूर्व गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात कोरड्या विसंगतींचे एक हॉटस्पॉट राहिले आहे. हे समजणे खूप कठीण आहे. उत्तरेकडील प्रदेश आणि हिमालयाच्या पायथ्याशीही २३ टक्के कमी पाऊस झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest