संग्रहित छायाचित्र....
Grameen Bharat Mahotsav in Delhi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी 11 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे 'ग्रामीण भारत महोत्सवा'चे उद्घाटन केले. यादरम्यान त्यांनी जनतेला संबोधित केले. पंतप्रधान मोदी यादरम्यान म्हणाले की, "2025 च्या सुरुवातीला ग्रामीण भारत महोत्सवाचा हा भव्य कार्यक्रम भारताच्या विकासाच्या प्रवासाची एक ओळख निर्माण होत आहे. हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल नाबार्ड आणि इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो."
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले होते की, "आपली गावे(खेडी) जितकी समृद्ध होतील, तितकीच विकसित भारताचा संकल्प साकार करण्यात त्यांची भूमिका मोठी असेल."
हमारे गांव जितने समृद्ध होंगे, विकसित भारत के संकल्प को साकार करने में उनकी भूमिका उतनी बढ़ेगी। इसी कड़ी में आज सुबह करीब 11 बजे दिल्ली में ग्रामीण भारत महोत्सव के शुभारंभ का सौभाग्य मिलेगा। यह आयोजन ग्रामीण अर्थव्यवस्था के लिए बहुत उपयोगी होने वाला है।https://t.co/3DD0rV2n0s
— Narendra Modi (@narendramodi) January 4, 2025
4 ते 9 जानेवारी दरम्यान चालणार महोत्सव....
ग्रामीण भारत महोत्सव 4 जानेवारी ते 9 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे आणि त्याची थीम 'विकसित भारत 2047 साठी एक लवचिक ग्रामीण भारत निर्माण करणे' आहे. हा महोत्सव ग्रामीण भारतातील उद्योजकता आणि सांस्कृतिक वारसा साजरा करेल.
ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणे, स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि ग्रामीण समाजात नवोपक्रमाला चालना देण्याच्या उद्देशाने महोत्सव विविध चर्चा आणि कार्यशाळा आयोजित करेल. तसेच, याद्वारे शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्याबरोबरच उद्योजकतेद्वारे ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
पंतप्रधानांकडून काल दिल्लीत 1675 सदनिकांचे उद्घाटन संपन्न...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दिल्लीच्या अशोक विहारमधील झुग्गी झोपरी (जेजे) क्लस्टरमधील रहिवाशांसाठी 1,675 नव्याने बांधलेल्या फ्लॅटचे उद्घाटन केले आणि पात्र लाभार्थ्यांना स्वाभिमान अपार्टमेंटच्या चाव्या सुपूर्द केल्या. उद्घाटनापूर्वी, पंतप्रधान मोदींनी सिटू झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत झुग्गी झोपरी (जेजे) क्लस्टरमधील रहिवाशांसाठी नव्याने बांधलेल्या सदनिकांचीही पाहणी केली.