संग्रहित छायाचित्र
देशासह राज्याच्या राजकीय वर्तुळात राजकीय चाणाक्या म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांना अटक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रशांत किशोर यांची प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक म्हणूनही ओळख आहे. बीपीएससी परीक्षा पेपर लीक प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते. दरम्यान आज पहाटे चारच्या सुमारात बिहार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.
गेल्या चार दिवसांपासून प्रशांत किशोर गांधी मैदान येथे बेमुदत आंदोलनाला बसले होते. दरम्यान पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र, सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी तेथे उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी पोलिस आणि जन सुराजचे प्रमुख प्रशांत किशोर यांच्या समर्थकांमध्ये रुग्णलयाबाहेर झटापट झाली. सरकार आमच्या एकोप्याला घाबरील. त्यांच्याविरोधा शारीरिक हिंसा निंदनीय आहे, अंस मत त्यांच्या समर्थकांचे आहे.
नेमकं प्रकरणा आहे तरी काय?
प्रशांत किशोर यांनी 2 जानेवारीला आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनासाठी आमरण उपोषण सुरु केलं होतं. बिहार लोक सेवा आयोग परीक्षा रद्द करावी, ही त्यांची मागणी आहे. बीपीएससीद्वारे १३ डिसेंबर रोजी एका परीक्षेचा पेपर लिक झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यावेळी शेकडो विद्यार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातला होता. यानंतर आयोगाने १२ हजार उमेदवारांची परीक्षा पुन्हा एकदा घेतली जावी असे आदेश दिले होते. या आदेशानंतर ४ जानेवारीला शहरातल्या विविध केंद्रांवर नव्याने परीक्षेचं आयोजन करण्यात आलं. ९११ केंद्रांवर परीक्षा योग्य पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. मात्र BPSC च्या परीक्षार्थी उमेदवारांनी समान संधी निश्चित करा असं सांगत सगळ्या केंद्रांवर पुन्हा आंदोलन सुरु केलं.
उमेदवार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला अपक्ष खासदार पप्पू यादव आणि जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पाठिंबा दिला. प्रशांत किशोर यांनी तर उपोषणही सुरु केलं. मात्र आज त्यांना अटक करण्यात आली.