Four dead bodies in house : धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघे आढळले मृतावस्थेत, समोरचे दृश्य बघून सगळेच हादरले

बंगळुरूच्या आरएमव्ही सेकंड स्टेज या भगत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 6 Jan 2025
  • 05:43 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बंगळुरूच्या आरएमव्ही सेकंड स्टेज या भगत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या कुटुंबातील चार जणांचे मृतदेह त्यांच्याच घरात आढळले आहेत.  अनुप कुमार (३८), पत्नी राखी (३५), पाच वर्षांची मुलगी अनुप्रिया आणि दोन वर्षांचा मुलगा प्रियांश अशी मृतांची नावे आहेत. हे प्रकरण सामूहिक आत्महत्या का घातपाताचा प्रयत्न आहे, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

अनुप कुमार यांचे कुटुंब मुळचे उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील होते. अनुप कुमार बंगळुरूत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. कुटुंबासह ते बंगळुरूतच स्थायिक झाले होते.

सोमवारी सकाळी त्यांच्या घरात काम करणारी मदतनीस आली.  बराच वेळ दार ठोठावूनही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे तिने शेजाऱ्यांना याबाबत सांगितलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घराचे दार उघडताच चार मृतदेह समोर असल्याचे आढळले. चौघांचे मृतदेह आढळल्याने परिसरातील नागरिक हादरले आहेत. 

प्राथमिक तपासात असे समोर आले की, अनुप कुमार आणि राखी यांनी त्यांच्या मुलांवर विषप्रयोग केला आणि त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या पाच वर्षीय मुलीची प्रकृती ठीक नव्हती. पाच वर्षीय अनुप्रिया स्पेशल चाईल्ड होती. हे कुटुंबाने पाँडिचेरीला जाणार होते. त्यासाठी  रविवारीच पॅकिंग पूर्ण करून ठेवले होते. मात्र त्याआधीच त्यांचे मृतदेह राहत्या घरात आढळले आहे. 

या कुटुंबाकडे मदतनीस होते. यापैकी दोघेजण स्वयंपाकी आणि एक जण केअर टेकर होता. प्रत्येकाला १५ हजार रुपये पगार दिला जात होता.

तथापि, घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे या घटनेची चौकशी वेगळ्या दृष्टीने देखील केली जात आहे. सदाशिवनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Share this story

Latest